Dongargan Shivrata No one followed social distance 
अहिल्यानगर

सोशल डिस्टन्सिंगचा  डोंगरगण शिवारात फज्जा

चंद्रभान झरेकर

नगर  : तालुक्‍यात यंदा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे डोंगरगण (ता. नगर) येथील रामेश्वर मंदिर परिसरातील सर्व धबधबे सुरू झाले आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पर्यटकांना येथे येण्यास बंदी आहे. तरीही पर्यटक येथे कोणतेही नियम न पाळता गर्दी करतात. पर्यटकांनी डोंगरगण शिवारात गर्दी करू नये, असे आवाहन सरपंच कैलास पटारे यांनी केले आहे. 

याबाबत पटारे यांनी म्हटले आहे, की नगर शहरापासून डोंगरगण अवघ्या 18 किलोमीटरवर आहे. यंदा पाऊस चांगला झाला. त्यामुळे डोंगरगण शिवारात सर्वत्र आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. सर्व धबधबेही सुरू झाले आहेत. मात्र, दरवर्षीप्रमाणे पर्यटकांनी यंदा येथे गर्दी करू नये.

कोरोनामुळे भाविक आणि पर्यटकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. डोंगरगण शिवारात शहरासह जिल्हाभरातून पर्यटक गर्दी करीत आहेत. शिवाय ते जिल्हाधिकाऱ्यांच्या कोणत्याच नियमाचे पालन करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो.

पर्यटकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करून सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर करावा, असेही सरपंच पटारे यांनी म्हटले आहे. 

डोंगरगण परिसरात आता पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. पर्यटकांना अटकाव करावा, अशी मागणी होत आहे. 
                                                         संपादन ः दौलत झावरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीवर तुकाराम मुंढेंचा प्रभाव चार महत्त्वाचे निर्णय; एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती

नाद खुळा...! वैभव सूर्यवंशीचा झंझावात अविश्वसनीय Catch ने रोखला, RCB च्या कर्णधाराचा Video तुफान व्हायरल झाला

Trump-Afghanistan: तालिबानची ट्रम्प यांना 1,000,000,000,000 डॉलरची ऑफर! बदल्यात ठेवली 'ही' मोठी अट

Kanakagiri Sambhaji Maharaj Memorial : कणकगिरीत थोरले संभाजी महाराजांच्या समाधीवर उभारली ४०० किलोची मेघडंबरी; पुण्यातील शिवप्रेमींचा ‘गनिमी काव्या’ने यशस्वी उपक्रम

Marathi News Live Updates : दिल्लीसह देशातील विद्यार्थी आंदोलनांशी संबंधित सर्व एफआयआर रद्द- सुप्रीम कोर्टाचे निर्देश

SCROLL FOR NEXT